पार्श्वभूमी

किशोरावस्था म्हणजे शरीर व मन वेगाने विकसित होण्याचा काळ! विकासाचा हा काळ आपल्यासोबत घेऊन येतो ते असंख्य प्रश्न.अनेक वेळा हे प्रश्न विचारणं कठीण जातं किंवा त्याची लाजदेखील वाटते. अनेकदा जे प्रश्न किशोरवयीन मुलं सहजासहजी कुणालाही विचारू शकत नाहीत, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अर्पणने हे पुस्तक लिहिले असून, हा त्यांना मदत करण्याचा एक प्रयत्न आहे. या पुस्तकाने त्यांच्या प्रश्नांची केवळ उत्तरंच दिली आहेत असं नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन, जर त्यांना कधी भविष्यात असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागला, तर स्वत:च्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते कोणत्या उपाययोजना करू शकतील, याबाबतीत मार्गदर्शनदेखील केलं आहे. हे पुस्तक किशोरांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या प्रौढांना त्यांचे प्रश्नं आणि समस्या संवेदनशीलतेने हाताळण्यापासून ते त्यांच्यासोबत सुसंवाद प्रस्थापित करण्यापर्यंतच्या, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेण्यासाठी निश्चितपणे मदत करेल.

भागीदारांचे अभिप्राय