वैयक्तिक सुरक्षा कोर्स
जेव्हा हा कोर्स पूर्ण होईल तेव्हा मुले स्वत:च्या सुरक्षेसाठी सक्षम झालेली असतील.
तुम्ही मुलांना सुरक्षित ठेवण्याचं उल्लेखनीय कार्य करत आहात. त्यांचा तुमच्यावर आणि अर्पणच्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमावर विश्वास आहे.
तुमचा कार्यक्रम खूप छान आणि प्रेरणादायी होता. तुमचा दृष्टिकोन आणि आमच्याशी संवाद साधण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींनी मला प्रभावित केले. अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केल्याबद्दल आम्ही खरंच तुमचे आभारी आहोत.
बाल लैंगिक शोषणाबद्दल माहिती देणं आणि मुलांना वैयक्तिक सुरक्षेबद्दल शिकवणं खरंच कठीण काम आहे पण हे काम सोपं होण्यासाठी "माझी वैयक्तिक सुरक्षा कार्यपुस्तिका" ची मदत झाली.