प्रिय पालक आणि शिक्षक,

तुमच्या मुलाच्या सुरक्षेबाबत तुम्ही दक्ष आहात हे आम्हाला माहीत आहे. आणि विशेषत: भारतात वैयक्तिक सुरक्षा आणि खाजगी अवयवांबद्दल आपल्या मुलांशी संवाद साधणे किती कठीण आणि जिकीरीचे आहे याचीदेखील आम्हाला जाणीव आहे.

आम्ही या आव्हानांना चांगल्या प्रकारे समजू शकतो कारण मागील दहापेक्षा अधिक वर्षांपासून आम्ही संपूर्ण देशभर एक दशलक्षाहून अधिक मुलांसोबत काम केले आहे आणि आम्हीदेखील या आव्हानांचा सामना केला आहे.

त्यामुळे आम्ही हे गोष्टींचं सचित्र पुस्तक प्रकशित केले असून तुमच्या चार ते सात वर्षांच्या मुलांबरोबर तुम्ही त्यातील कथा वाचू वैयक्तिक सुरक्षेच्या संवादाची सुरुवात करू शकता. या गोष्टींच्या माध्यमातून सुरक्षित आणि असुरक्षित परिस्थिती कशी ओळखायची आणि असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागल्यास मदतशील प्रौढ व्यक्तींकडून मदत कशी मिळवायची हे तुमच्या मुलांना शिकता येईल.

या गोष्टींच्या पुस्तकातून आपण मुलांना खाजगी अवयवांची नावे शिकवत नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. खाजगी अवयवांमध्ये आपल्या शरीराच्या अशा अवयवांचा समावेश होतो ज्यांना आपण अंतर्वस्त्रांच्या साहाय्याने झाकून ठेवतो.

हे पुस्तक तुम्ही तुमच्या मुलांसोबत वाचावे असे आम्ही आवाहन करतो. जर अर्पणकडून आपणास कसल्याही मदतीची कधीही गरज भासल्यास, तुम्ही आमच्याशी नेहमीच संपर्क साधू शकता.

धन्यवाद,
टीम अर्पण

प्रशंसापत्र